शिवसेना मोदींवर नाराज

February 25, 2009 8:53 AM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारीगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपची सर्व सूत्रं दिली गेली आहेत. 8 फेब्रुवारीला हा निर्णय भाजपनं घेतला. पण सतरा दिवस झाले तरी नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतलेली नाही. यामुळे शिवसेनेचे नेते नाराज आहेत. आज नरेंद्र मोदी विदर्भात गोंदिया इथं तसंच नाशिकजवळ पिंपळगाव इथं प्रचार सभा घेत आहेत. एरवी शिवसेना-भाजप युती एकत्रितपणे निवडणूक प्रचाराला सुरुवात करते. त्यासाठी मुंबईत शिवाजीपार्क किंवा गिरगाव चौपाटी इथं जाहीर सभा घेतल्या जातात. पण आता शिवसेनेला धुडकावून भाजपनं स्वतंत्रपणे निवडणूक प्रचार सुरू केलाय. त्यामुळे शिवसेना नेते खाजगीत नाराजी व्यक्त करत आहेत. मंगळवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुंबईत आले. पण शिवसेनाप्रमुखांना ते भेटले नाहीत वा ती भेट त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेतच नव्हती. अडवाणींचा दौरा अगोदरच ठरला होता. दौरा ठरवण्याच्या वेळेसच शिवसेनाप्रमुखांकडे अडवाणींच्या भेटीसाठी भाजप नेत्यांना वेळ मागता आली असती. पण ते भाजप नेत्यांनी तसं केलं नाही. याबाबतही शिवसेनेत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. भाजप नेते शिवसेनेला उपेक्षेनं वागवताहेत आणि वर शिवसेनेनं जागावाटप लवकर करावं अशी अपेक्षा धरत आहेत असं शिवसेनेतील सूत्रांचं म्हणणं आहे.

close