न्यूझीलंड विजयी

February 25, 2009 9:13 AM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारीख्राईस्टचर्च इथली पहिली टी-20 मॅच न्यूझीलंडने 7 विकेटने जिंकली . या आधी न्यूझीलंडने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिली बॅटिंग करताना भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 163 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. ते आव्हान न्यूझीलंडने 19व्या ओव्हरमध्येच पूर्ण केलं.न्यूझीलंडतर्फे ओपनर ब्रँडन मॅक्युलमने नॉटआऊट 55 रन्स केले. तर ग्युपटिल आणि जेकब ओरम यांनी त्याला चांगली साथ दिली. रॉस टेलरने 31 रन्स केले. भारतातर्फे झहीर, ईशांत आणि हरभजन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यापूर्वी भारतीय टीमने 162 रन्सची मजल मारली ती सुरेश रैनाच्या नॉटआऊट 61 रन्सच्या जोरावर. भारतीय बॅट्समन फटकेबाजीच्या नादात आऊट होत असताना रैनाने एक बाजू लावून धरली आणि भारताला दीडशे रन्सचा टप्पाही ओलांडून दिला.त्याच्यानंतर सेहवागने सर्वाधिक 26 रन्स केले. ख्राईस्टचर्चचं ग्राऊंड छोटं आहे. त्यामुळे मॅचमध्ये सिक्सरची बरसात झाली. भारतीय इनिंगमध्ये एकूण 13 सिक्स लगावले गेले. तर न्यूझीलंडतर्फे 10 सिक्सची बरसात झाली.

close