शिववडयाच्या प्रस्तावाला सुधार समितीची मंजुरी

February 25, 2009 9:42 AM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारीब-याच दिवसांपासून वादात असलेल्या शिववडयाच्या प्रस्तावाला पालिकेच्या सुधार समितीमध्ये मंजुरी मिळाली. आता मुंबई महापालिका सभागृहामध्ये हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे शिववडापावची मागणी शिवसेनेनं केल्यानंतर काँग्रेसनं कांदापोह्यांचा प्रस्ताव आणला होता. सुधार समितीमध्ये शिवसेना- भाजपाचे 13, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक आहेत. त्यामुळे कांदापोहे आणि शिववडा हे दोन्ही प्रस्ताव मंजूर व्हावेत, असं दोन्हीकडच्या नगरसेवकांना वाटत होतं. पण काँग्रेसचे दोन नगरसेवक अनुपस्थितीत राहिल्यामळे कांदापोह्यांचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. तर मनसेनं आश्चर्यकारकरित्या शिववडयाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्यामुळे बहुमताच्या वादात असलेला शिववड्याचा प्रस्ताव मंजूर झाला. तर मनसेनं भूमिपुत्रांना स्टॉल देण्यात प्राधान्य मिळावं अशी मागणी केली.

close