बांगलादेशात जवानांचं बंड

February 25, 2009 11:03 AM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारीबांगलादेशमध्ये बांगलादेश रायफल्सच्या जवानांनी बंड केलंय. काही नाराज जवानांनी हे बंड केलंय. या जवानांनी बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये बीडीआरच्या मुख्यालयात जोरदार फायरिंग केली. या फायरिंगमध्ये आतापर्यंत 20 जण ठार झाले आहेत. यात लष्कराचे काही सीनिअर ऑफिसर्सही मारले गेले असण्याची भीती व्यक्त होतेय. फायरिंगमध्ये बांगलादेशचे डीजीही मारले गेलेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. तसंच या जवानांनी काही अधिका-यांना ओलीस ठेवलं आहे. या भागाचा ताबा घेण्याचा प्रयत्न लष्कराकडून केला जातोय. दरम्यान बंड करणा-या जवानांशी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान शेख हसिना यांनी एक टीम बीडीआर मुख्यालयात पाठवण्याचा निर्णय घेतलाय. तसंच आपत्कालीन बैठकही बोलावण्यात आली आहे.

close