12वी बोर्डाचा गलथानपणा मार्टीन डिसुझाला भोवला

March 1, 2009 3:07 AM0 commentsViews: 9

1 मार्च, मुंबईउदय जाधवविद्यार्थी वर्षभर अभ्यास करुन परीक्षेची तयारी करतात. पण 12वी बोर्डाच्या अजब कारभारामुळं विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होतं, याचं उदाहरण समोर आलंय. विक्रोळीच्या एका विद्यार्थ्याला बोर्डाने चक्क एक दिवस आधी पेपरचा विषय बदलण्याचं लेटर दिलंय. विक्रोळीला राहणारा मार्टीन डिसुझा सध्या बारावीची परीक्षा देतोय. सकाळी काम करून तो नाईट कॉलेजमध्ये शिकतो. त्यानं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषय परीक्षेसाठी घेतला होता. पण परीक्षा सुरू झाल्यावर त्याला बोर्डाने लेटर पाठवलंय की त्याने इंफॉरमेशन टेकनॉलॉजीचा पेपर न देता हिंदी भाषेचा पेपर द्यावा. मार्टीन डीसुझानं गेले वर्षभर इंफॉरमेशन टेकनॉलॉजीचा अभ्यास केला. आणि बोर्डाने त्याची या विषयाची, तेरा फेबु्रवारीला प्रॅक्टीकल परीक्षाही घेतली. पण तेव्हा बोर्डानं त्याच्या प्रॅक्टीकल परीक्षेवर कोणताच आक्षेप घेतला नाही. मार्टीनला परीक्षेच्या फक्त एक दिवस आधी आपल्या बदललेल्या विषयाची माहिती देण्यात आली. याबाबत आयबीएन लोकमतने त्याच्या कॉलेजचे प्रिन्सिपल टी.एम.पांडे यांना विचारलं असता त्यांनीही बोर्डाची चूक असल्याचं सांगितलं. विद्यार्थी वर्षभर अभ्यास करुन परिक्षेची तयारी करत असतात. त्यातच नाइट कॉलेजचे विद्यार्थी तर नोकरी सांभाळुन शिकत असतात. आणि बोर्ड मात्र मनमानी कारभार करुन, या विद्यार्थ्यांच्या करीअरशी खेळतंय.

close