पंढरपूरमध्ये चाललीय राजरोस कॉपी

March 1, 2009 3:12 AM0 commentsViews: 1

1 मार्च, पंढरपूरसुनील उंबरे 12 वीच्या परीक्षा आणि कॉप्यांचा पाऊस, यांची जणू काही फार मोठी परंपरा असल्याचंच वारंवार दिसून येतं. पंढरपूर तालुक्यातल्या भैरवनाथ-वाडीच्या वामनराव माने महाविद्यालयाने ही कथित आणि कुप्रसिद्ध परंपरा अगदी निष्ठेनं जपली आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांबरोबरच कॉपीबहाद्दरांनाही कुणाचाही त्रास होऊ नये, म्हणून विद्यालयात सगळीकडं चोख बंदोबस्त असतो. पेपर संपल्यावर कॉप्यांच्या चिठ्‌ठ्यांचा पाऊस आणि पुस्तकरूपी भल्या थोरल्या गारा कॉलेजच्या खिडकीखाली उभ्या असणा-याच्या अंगावर कोसळतात. संस्थेचे संस्थापक आणि प्राचार्य सुभाष माने मात्र याविषयावर बचावात्मक पावित्रा घेतात. प्राचार्य सुभाष माने हे आधीच राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षआहेत. तसंच त्यांना असणारा राजकीय पाठिंबा पाहता आणि ते स्वत:च्याच धुंदीत असल्यानं विद्यार्थी कशा परीक्षा देतायत, याचही भान त्यांना राहीलं नाहीये.

close