नवीन चावलांना हटवण्याची मागणी राष्ट्रपतींनी फेटाळली

March 1, 2009 9:48 AM0 commentsViews:

1 मार्च दिल्लीकाही दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त गोपाळ स्वामी यांनी नवीन चावला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. यावर केंद्र सरकारनं राष्ट्रपतींना मुख्य निवडणूक आयुक्त गोपाळ स्वामी यांची ही मागणी फेटाळण्याची शिफारस केली. केंद्र सरकारचं म्हणणं मान्य करत राष्ट्रपतींनी मुख्य निवडणूक आयुक्तांची, चावलांना हटवण्याची मागणी फेटाळली. आता राष्ट्रपतींच्या या निर्णयामुळे चावलांचा मुख्य निवडणूक आयुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.निवडणूक आयोगातला वाद समोर आल्यानंतर केंद्र सरकारने याबाबतचा एक अहवाल राष्ट्रपतींना सादर केला होता. राष्ट्रपतींनी केंद्राचं मत मान्य करत नवीन चावला हे पदावर कायम राहतील असा निर्णय दिला. त्यामुळे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त गोपाळ स्वामी निवृत्त झाल्यानंतर नवीन चावला हेचं मुख्य निवडणूक आयुक्त होतील.

close