26/11 हल्यांतून बचावलेले श्रीवर्धनकर

December 7, 2008 12:09 PM0 commentsViews: 1

7 डिसेंबर मुंबईरोहिणी गोसावीमुंबई दहशतवादी हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. परंतु त्यापैकी काहीजण मृत्यूच्या दारातून बचावले देखील आहेत. त्यापैकीच एक हरिशचंद्र श्रीवर्धनकर. 26/11च्या रात्री दहशतवाद्यांनी श्रीवर्धनकरांच्या मानेवर चाकूने 2वार केले. या हल्ल्यात श्रीवर्धनकर बचावले. मात्र त्यांनी वाचा गमावली आहे. आता त्यांच्यावर जे.जे.रुग्णालयात औषधोपचार चालू आहेत. श्रीवर्धनकर हे एकमेव असे जखमी आहेत ज्यांच्यावर दहशतवाद्यांनी चाकूने हल्ला केला आहे. श्रीवर्धनकर मंत्रालयातील फूड सप्लाय विभागात कामाला आहेत. हल्ल्याच्यावेळी ते इलेक्शन ड्युटीवर होते. श्रीवर्धनकर ठार झाले असं समजून दहशतवाद्यांनी त्यांना सोडून दिलं होतं. आता श्रीवर्धनकर हळूहळू बरे होतं आहेत. काही दिवसांनंतर ते बोलूही लागतील. परंतु यासगळयांचा त्यांच्यावर झालेला मानसिक धक्का मोठा आहे. पण म्हणतात ना काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.

close