वीजबचतीसाठी सरकारची बचतलॅम्प योजना

March 1, 2009 9:49 AM0 commentsViews: 2

1 मार्च दिल्ली मनीषा सिंह वीजबचत करण्यासाठी आता खुद्द सरकार जनतेची मदत करणार आहे. बचतलॅम्प ही नवी योजना सरकारनं आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारनं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर केवळ पंधरा रुपयात उर्जाबचत करणारे सीएफएल बल्ब आणले आहेत. बचत लॅम्पची ही नवी योजना सामान्यांच्या खिशासाठीही एक स्वस्त योजना आहे. ज्यात केंद्र सरकार, खाजगी कंपन्या आणि राज्यांमधील वीज वितरण कंपन्या मिळून ग्राहकांना फक्त पंधरा रुपयात उच्च दर्जाचे सीएफएल लॅम्प उपलब्ध करून देणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी वीस कंपन्यांनी तयारी दाखवली आहे. यात सीएफएल बल्ब बनवणा-या आणि असे बल्ब घाऊक प्रमाणात घेऊन खुल्या बाजारात विकणा-या काही कंपन्या आहेत. सध्या ही योजना आंध्र प्रदेश आणि हरियाणापुरतीच मर्यादित आहे. उर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे सांगतात, पंचवार्षिक योजनेत 92हजार मेगावॅटची अतिरिक्त वीज देण्याची योजना आहे. त्यामुळे वीजेची बचतही तितकीच आवश्यक आहे. अशा योजनामुळे वीज बचतीबरोबर सर्वसामान्यांचा फायदाही होणार आहे.देशातल्या एकूण वीज वापरापैकी वीस टक्के वापर हा बल्ब आणि ट्यूबलाइटच्या माध्यमातून होतो. सीएफएल बल्ब साधारण बल्बपेक्षा पाच टक्के वीजबचत करतो पण याची किंमत जास्त असल्यामुळे याचा वापर करणारी पाच ते दहा टक्केच घरं आढळतात. म्हणूनच वीजबचतीचं महत्त्व पटवून देण्यासाठी सरकार ही बचत लॅम्पची योजना घेऊन आलं आहे.

close