अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विज्ञान यात्रेचं आयोजन

March 1, 2009 8:29 AM0 commentsViews: 112

1 मार्च ठाणे मनोज देवकर सापांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेने 35 दिवसांच्या प्रवासात राज्यभरातल्या विविध गावात भेटी दिल्या. शनिवारी ठाण्याच्या कोपरी भागात या विज्ञान यात्रेचा समारोप झाला.अंधश्रद्धा निर्मूलनाची ही आगळी वेगळी यात्रा 27 जानेवारीला औरंगाबादपासून सुरू झाली होती. महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमधून फिरलेल्या या यात्रेत सापांचं प्रदर्शन आणि सापांबद्दलची जनजागृती करण्यात आली. अनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर सांगतात, निरनिराळया सापांची ओळख करून देणं. सर्पविषयक अंधश्रद्धांची लोकांना माहिती करून देणं आणि विशेष म्हणजे सर्पदंशानंतरच्या प्रथमोपचाराची लोकांना माहिती करून देणं हा या प्रदर्शनाचा हेतु होता. या यात्रेला सर्पमित्रांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचाही चांगला प्रतिसाद लाभला. अशी यात्रा प्रत्येक जिल्ह्यात भरली पाहिजे असा सूर सर्पमित्रांनी लावला होता.सापांविषयी सामान्यांच्या मनात भीती असते. मात्र या भीतीचं रूपांतर कुतूहलात झालं तर साप वाचवता येतील हे मात्र नक्कीच.

close