औरंगाबादमध्ये ऋतुरंग महोत्सवाचं आयोजन

March 1, 2009 3:39 PM0 commentsViews:

1 मार्च औरंगाबाद औरंगाबादमध्ये रोटरी मेट्रो आणि नाद फाऊंडेशनच्या वतीनं ऋतुरंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रंगत आणली ती कथ्थक नृत्यानं. ध्रुपद गायक अफजल हुसेन यांच्या गायनानं या महोत्सावाची सुरुवात झाली. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत कथ्थक नृत्यांचा अविष्कार औरंगाबादकरांना पाहायला मिळाला. सुरुवातीला ध्रुपद गायनानं मंत्रमुग्ध केलेल्या रसिकांना कार्यक्रमाच्या अखेरीस कथ्थक नृत्यांनी ताल धरायला लावली. भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याचा अविष्कार रसिकांना मिळवून देण्यासाठी हा महोत्सव दरवर्षी घेण्यात येणार आहे. महोत्सवाला रसिकांनीही भरभरून दाद दिली.

close