बांगलादेशातल्या बंडात पाकिस्तानचा हात ?

March 1, 2009 4:08 PM0 commentsViews: 2

1 मार्च बांगलादेश रायफल्सच्या जवानांनी केलेल्या बंडामागे पाकिस्तानातल्या कट्टरवाद्यांचा हात होता, असे पुरावे समोर येत आहेत. बांगलादेशातल्या शेख हसीना यांच्या सरकारनंही तसे संकेत दिले आहेत. अटक केलेल्या काही बंडखोर जवानांनी या कटात सलाऊद्दीन कादीर चौधरी यांचं नाव घेतलंय. तो बांगलादेशातला शिपिंग क्षेत्रातला एक नावाजलेला व्यावसायिक आहे. त्याचे पाकिस्तानी लष्कराशी संबंध असल्याची माहिती या जवानांनी दिली. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल मोईन खान यांच्या हत्येचा कटही रचला गेल्याचं या चौकशीतून समोर आलंय. बीडीआरच्या जवानांमध्ये असंतोष निर्माण करून पंतप्रधान शेख हसीना यांचं सरकार उलथवून लावण्याचा विरोधकांचा कट होता. या कटासाठी 1 कोटी टकाची आगाऊ रक्कमही बंडापूर्वी देण्यात आली होती, असं जवानांनी कबूल केलंय. दरम्यान, बीडीआरच्या एक हजार जवानांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत.

close