सोलापुरातले विडी कामगार पुन्हा कामावर

December 7, 2008 7:47 AM0 commentsViews: 90

7 डिसेंबर सोलापूरसोलापुरात विडी कामगारांना दिलेल्या कमी करण्याबाबतची नोटीस परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विडी कामगार संघटना, विडी कारखाना मालक संघटना आणि कामगार सह-आयुक्त याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाननं विडी कायद्याला सहा महिन्यांची स्थगिती दिली. त्यामुळे सहा महिन्यांसाठी कामगार कपाती बाबतची नोटीस परत घेण्यात आली आहे. पण सहा महिन्यांनतर या कायद्यात बदल झाला नाही तर विडी कामगाराना पुन्हा कामगार कपातीची भीती आहे. या कायद्यामुळे विडी कामगार मालकानी 40% कामगार कपातीची निर्णय घेतला होता.

close