नंदुरबारमधल्या जीप अपघातात 9 जण ठार

March 2, 2009 5:41 AM0 commentsViews: 1

2 मार्च नंदुरबार

नंदुरबारमध्ये जीप नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात नऊजण ठार झाले आहेत. नवापूरमधल्या राळेगण शिवार इथल्या रंगावल्ली नदीत ही दुर्घटना घडली आहे. या जीपमधील ठार झालेले 9 विद्यार्थी गुजरातचे रहिवासी आहेत.पहाटे साडे चार दरम्यान ही घटना घडली. हे सगळे विद्यार्थी गुजरातमधल्या उच्छल गावातून कम्प्युटर परीक्षेसाठी चालले होते. मृतांमध्ये 6 विद्यार्थी, 2 विद्यार्थीनी आणि जीपचालकाचा समावेश आहे. पुलाचा कठडा तोडून जीप सुमारे 100 फूट नदीच्या कोरड्या भागात कोसळली. या दुर्देवी विद्यार्थ्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी नवापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत.

close