रिलायन्स पेट्रोलियमच्या विलिनीकरणाला मंजुरी

March 2, 2009 7:57 AM0 commentsViews: 5

2 मार्चरिलायन्स पेट्रोलियमचं अखेर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलिनीकरण झालं आहे. सकाळीच विलिनीकरणाच्या या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डची बैठक सुरू झाली. या विलिनीकरणानंतर, आता रिलायन्स पेट्रोलियमच्या भागधारकांना, आरपीएलच्या 16 शेअर्समागे रिलायन्स इंडस्ट्रीजचा प्रत्येकी एक शेअर मिळणार आहे. हे विलिनीकरण आरपीएलच्या भागधारकांसाठी फायद्याचं दिसत असलं तरी रिलायन्स इंडस्ट्रीच्या भागधारकांची या व्यवहारामुळे निराशा झाली आहे. एक एप्रिल 2008पासून विलीनीकरण लागू होणार आहे. कंपनी आरपीएलच्या भागधारकांना एकूण 6.92 कोटींचे शेअर्स देणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलंय. मंदीत उद्भवलेल्या अनेक आर्थिक अडचणींमुळे अखेर फंड्सच्या कमतरतेमुळे हे विलिनीकरण करावं लागलं असल्याची मार्केटमध्ये चर्चा आहे.

close