सौरभी इंडियन आयडॉल

March 2, 2009 6:31 AM0 commentsViews: 1

2 मार्च मुंबईसोनी टीव्हीवर सुरू असलेल्या चौथ्या इंडियन आयडॉलचा किताब त्रिपुराच्या सौरभी देबबर्मा हिने पटकावला.अनु मलिक यांच्या हस्ते तिला 1 करोड रुपयांचा चेक आणि टाटा विंगर कार देण्यात आली. तिच्या स्वागतासाठी त्रिपुराचे राजे प्रद्युम स्वत: हजर होते.जॉन अब्राहम, कतरिना कैफ, नील नितीन मुकेश,उदित नारायण यांच्यासहित अभिजित सावंत,संदीप आचार्य, प्रशांत उमंग या आधीच्या इंडियन आयडॉलचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती.यापुढे आपण देशवासीयांचे असंच मनोरंजन करीत राहू असं सांगत सौरभीने देशवासीयांचे आभार मानले. सौरभी, तोरशी सरकार आणि कपिल थापा या तिघांमध्ये इंडियन आयडॉलच्या मुकुटासाठी रस्सीखेच होती.

close