रत्नागिरीत रिक्षा संघटनांचा बेमुदत संप

March 2, 2009 5:46 AM0 commentsViews: 1

2 मार्च रत्नागिरीरत्नागिरी शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या रिक्षासंघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात 14000 रिक्षाचालक सहभागी झाले आहेत. सिटी बसमध्ये जास्त गर्दी होत असल्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. पेट्रोल दर उतरल्याने ठाणे परिवहन कार्यालयाने सुचवलेली भाडेकपात रिक्षा धारकांना मंजूर नाही . एक किलोमीटरला 12 रुपये दर आकारण्यास परवानगी मिळावी अशी रिक्षाचालकांची मागणी आहे. तसंच रत्नागिरीची भौगोलिक परिस्थिती पाहता परिवहन कार्यालयाने सुचवलेली भाडेकपात शक्य नसल्याचं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे.

close