नाशिकच्या नूतन विद्यामंदिरात राजरोज कॉपी

March 5, 2009 3:30 PM0 commentsViews: 1

5 मार्च, नाशिक नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उघडपणे कॉप्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. नूतन विद्यामंदिर या शाळेतल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलाय. परीक्षा सुरू होताच काही वेळात भरारी पथक आल्याबरोबर शाळेच्या खिडक्यांतून कॉप्याचे कागद बाहेर फेकले गेले. विद्यार्थ्यांना सावध करण्यासाठी दगडंही फेकली गेली. शाळेच्या इमारतीच्या छतावर, खिडक्यांतून अगदी सर्रासपणे बाहेरची मुलं कॉप्या पुरवत होते. त्र्यंबकेश्वर मधली परीक्षा केंद्र दरवर्षी कॉप्यासाठी बदनाम असूनही यावेळी योग्य ती व्यवस्था ठेवली नाही, हे यावरून अगदी स्पष्ट होतंय.

close