नागपूरच्या बाजारात आली राजस्थानी संत्री

March 5, 2009 4:03 PM0 commentsViews: 43

5 मार्च, नागपूर कल्पना नळसकर नागपूरची ओळख म्हणजे नागपूरची संत्री. पण आता ही ओळख फक्त नावापरतीच राहणार अशीच सध्याची स्थिती आहे. या वर्षी मृग बहार न आल्यानं संत्र्याचं उत्पादन कमी झालंय. त्यामुळं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर राजस्थानमधून संत्री विकायला आलीयत. " मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी खूप कमी भावा दिला. राजस्थानची संत्री आल्यानं भावावर फकर पडलाये, " अशी माहिती शेतकरी भीमराव करवाढे यांनी दिलीये. " 20 जानेवारीपर्यंत मार्केटमध्ये संत्री येतात. पण यंदा आमच्याकडे संत्री आली नाहीत. त्यात राजस्थानमध्ये सर्वात यंदा संत्र्यांचं चांगलं उत्पादन आलं आहे. तसंच त्यांचे दर हे इतरांना परवडण्याजोगे आहेत. त्यामुळे आम्ही बाजारात नागपूरची संत्री विकायला आणली, " अशी माहिती व्यापारी मेघराज यांनी दिली.राजस्थानच्या संत्र्यांनी नागपूरच्या संत्र्याचं मार्केट खाऊन टाकलंय. ठोक बाजारात नागपूची संत्री 10 ते21 हजार रुपये प्रतिटन आहेत. तर राजस्थानची संत्री 8 ते 15 हजार रुपये प्रतिटन आहेत. बाजारात आलेली संत्री ही नागपूरची का राजस्थानची हे जरी ओळखता येत नसल तरी सर्वांना आवडतात ती नागपूरची संत्री.पण राजस्थानवरुन येणा-या संत्र्याची आवक पाहता. नागपूरी संत्री लोप पावताना दिसतेय.किरकोळ बाजारात तर 90 टक्के मार्केट राजस्थानी संत्र्यांनी काबिज केलंय. पण ग्राहकांचं मात्र मत आहे – नागपूरची संत्री खूप मिठी असतात.राजस्थानची संत्री मोठी असतात पण त्याला चव नसते.रोख पीक असणार्‍या संत्र्याला निर्सगाची दृष्ट तर लागलीच होती,पण आता त्यात भर पडली आहे, राजस्थानी संत्र्यांचीही

close