श्रीलंकन टीमवरच्या हल्ल्यामागे एलटीटीईचा हात असल्याचा संशय

March 5, 2009 4:29 PM0 commentsViews: 2

5 मार्च

श्रीलंकन क्रिकेट टीमवरील हल्ल्यामागच्या तपासाला आता एक वेगळं वळण लागलं आहे. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री रोहिता बोगल्लगमा यांनी या हल्ल्यात एलटीटीईचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. लंकेचे परराष्ट्र मंत्री या हल्ल्याच्या संदर्भात माहितीसाठी पाकिस्तानमध्ये गेले होते. त्या दौ-यात ते पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी आणि पंतप्रधान गिलानी यांना भेटले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना बोगल्लगमा म्हणाले की, या हल्ल्यामागे एलटीटीईचा सहभाग आहे का याची चौकशी करणं गरजेचं आहे. कारण श्रीलंकन लष्कराने केलेल्या कारवाईमुळे तमीळ वाघांनी आपला खूप मोठा प्रदेश गमावला आहे.आणि यामुळे एलटीटीईची अस्वस्थता खूप वाढली आहे. याच अस्वस्थेमुळे या तमीळ वाघांनी हा हल्ला केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. परदेशात असताना पहिल्यांदाच श्रीलंकन टीमवर असा हल्ला झाला आहे.

close