नगर विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाण्यात पाहणी दौरा

March 6, 2009 8:34 AM0 commentsViews: 16

6 मार्च , ठाणे ठाण्यात डंपींग ग्राऊंडच्या विषयावरून राष्ट्रवादीनं केलेल्या आंदोलनानंतर काल, नगर विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठाण्याचा पाहणी दौरा केला. या विषयावर पंधरा दिवसांत तोडगा काढण्याचं आश्वासन मुश्रीफ यांनी दिलं. डंपींग ग्राउन्डच्या प्रश्नावरून बुधवारी ठाण्यात राष्ट्रवादीनं आंदोलन केलं होतं. यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. डंपींग ग्राउंडचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही लोकसभेच्या निवणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय इथल्या स्थानिकांनी घेतलेला. दरम्यान मुश्रीफ यांच्या आश्वासनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी काल जामीन घेतला. मात्र त्यांनी डंपींग ग्राऊंडवर मुदत संपल्यानंतरही कचरा टाकणार्‍या मंबई महानगर पालिकेचे महापौर आणि आयुक्त त्यांच्याविरोधात मुलूंड पोलीस ठाण्यात तक्रार नोदवायचं ठरवलंय.

close