मनसे नेते शिवाजी भोर यांच्यावर प्राणघातक हल्ला

March 6, 2009 8:37 AM0 commentsViews: 21

6 मार्च , नाशिक निरंजन टकले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकरोड परिसरातील नेते शिवाजी भोर यांच्यावर गुरुवारी रात्री अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. रात्री घरी परतत असताना शिवाजी भोर यांच्यावर अचानक पाठिमागून गुप्ती आणि चाकूने दोन जणांनी वार केले. मारेकरी लगेचच दुचाकी वाहनावरून पळून गेले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच हा हल्ला झाल्यानं पोलीस किती कडक कारवाई करतात याकडेच सर्वांचं लक्ष आहे. शिवाजी भोर यांनी तीन महिन्यांपूर्वीच शिवसेनेतून मनसेत प्रवेश केला होता. शिवसेनेत असताना भोर हे श्रमिक सेना या कामगार आघाडीचे महानगरप्रमुख होते. शिवाजी भोर यांच्यावर वॉकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कोणावर गुन्हा नोंदवला नाहीये. पण शिवाजी भोर मनसेतून शिवसेनेत येताना त्यांनी काही नेत्यांवर टीका केली होती. या हल्ल्यामागे राजकीय वैमनस्य असण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. ज्यावेळी पोलीस गुन्हा नोंदवतील त्यावेळी या हल्ल्याचं कारण स्पष्ट होईल.

close