आयपीएलच्या तारखा बदलण्याबाबत पी. चिदंबरम् यांची माघार

March 6, 2009 8:53 AM0 commentsViews: 2

6 मार्च, हैद्राबादचिदंबरम यांनी घेतली माघार, आयपीएलच्या तारीख बदलायला मी सांगितल्याच नव्हत्या, असा नवा पावित्रा गृहमंत्री चिदंबरम यांनी घेतला आहे. आगामी निवडणुका आणि त्याच दरम्यान होणारे इंडियन प्रिमिअर लीगचे म्हणजे आयपीएलचे क्रिकेट समाने पाहता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. इंडियन प्रिमिअर लीगच्या आयोजनाचा गोंधळ आता लवकरच संपण्याची चिन्ह आहेत. केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी पुढाकार घेऊन आयपीएल नीट पार पडावं यासाठी आयोजकांना मदत करण्याची तयारी दाखवलीय. स्पर्धा पुढे ढकलण्याचा प्रस्ताव आपण ठेवलाच नव्हता असंही त्यांनी हैदराबादमध्ये घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलं. राज्य सरकार सुरक्षा व्यवस्था पुरवण्यास तयार नसेल तर आयपीएल भारताबाहेर भरवण्याचा इशारा आज सकाळी ललित मोदी यांनी आजच सकाळी दिला होता. या बातमीमुळे सगळीकडे पुन्हा खळबळ माजली होती. पण आयपीएल ही इंडियन लीग आहे. त्यामुळे ती भारताबाहेर होऊच शकत नाही, असं म्हणत चिदंबरम् यांनी या चर्चेला पूर्णविराम दिलाय.

close