राणेंचे आरोप बिनबुडाचे – शकील अहमद

December 7, 2008 3:36 AM0 commentsViews: 1

7 डिसेंबर, मुंबईकाँग्रेसमधील काही नेत्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या राणेंच्या विधानाची काँग्रेस पक्षानं दखल घेतली. राणेंनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असं ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री शकील अहमद यांनी म्हटलं आहे. "ज्यांच्यावर त्यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचे आरोप केले आहेत, त्यांचं समर्थन घेऊन राणे मुख्यमंत्री बनायला तयार होते. पण आता राणे मुख्यमंत्री न बनू शकल्यामुळेच हे आरोप करत आहेत" असं ते म्हणाले.

close