नॅनोचा फटका बसणार जुन्या कार्सना

March 6, 2009 4:08 PM0 commentsViews: 6

6 मार्च, मुंबईरुपाली शिंदे टाटांची सर्वाधिक चर्चेत असलेली नॅनो आता बाजारात उतरणार आहे. पण या लाँचिंगचा फटका बसलाय तो सेकंड हँड कारच्या बीजनेसला. नॅनोचं लाँचींग येत्या 23 मार्चला होणार आहे आणि एप्रिल महिन्यात नॅनो ग्राहकांना उपलब्ध होईल. ग्राहकांसाठी ही सुखद बातमी असली तरी सेकंड हँड गाड्यांच्या बिझनेसला मात्र फटका बसलाय. मंदी आणि बँकांच्या कडक नियमांमुळे सेकंड हँड गाड्यांच्या डिलर्सना नुकसान सोसावं लागतंय. नॅनोच्या लाँचिंग आधीच, दोन महिन्यांतच मारुती झेन, मारूती 800 या गाड्यांची किंमत दीड लाखांवरून एक लाख पाच हजारांवर घसरलीय. ओरिजिनल गाड्यांच्या किंमतीच कमी होत असल्यामुळे सेंकडहँड गाड्यांकडे वळणारे ग्राहक कमी झाल्याचं हे डिलर्स म्हणतायत. " आम्हाला 10-15टक्के किंमत कमी करावी लागेल.ज्यांचा 1 लाख बजेट असेल ते नॅनो नक्की घेतील, असं कार प्लाझाचे मालक संभाजी चौहान म्हणाले. सेकंड हँड गाड्यांचा प्रेक्षकवर्ग फार कमी आहे आणि त्यात भर म्हणजे नॅनोचं होणारं लाँचिंग. ज्याच्यामुळे सेकंड हँड कारच्या बिजनेसला नुकसान सोसावं लागतंय.आता या गाड्यांचा वाली कोण असा प्रश्न इथे निर्माण होतोय.नॅनोचं बेसीक मॉडेल 1 लाख सहा हजार तर एसी मॉडेल सव्वा लाखांपर्यंत उपलब्ध होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ऑटो सेक्टरमध्ये नॅनो छोट्या गाड्यांना टक्कर देईल. नॅनो एक वेगळा ग्राहकवर्ग निर्माण करेल अशी खात्री ऑटो एक्सपर्ट नयन वाला यांना आहे.

close