सुनंदन लेलेंची वेबसाईट लॉन्च होतेय

March 6, 2009 4:12 PM0 commentsViews:

6 मार्च, मुंबई ऋजुता सटवे क्रिकेटविषयी कुठलीही माहीती हवी असेल तर इंग्लिशमध्ये अनेक वेबसाईट्स आहेत… पण आता अगदी मराठमोळी साईट आणि ती ही मराठमोळ्या माणसाने सुरु केलेली सुरु होतेय. आयबीएन – लोकमतचे कन्सल्टिंग स्पोर्ट्स एडिटर सुनंदन लेले यांनी सुरू केलेल्या या साईटमध्ये क्रिकेटआणि एंटरटेनमेंट असं दोन्ही आहे. सुनंदन लेले यांनी जवळजवळ 25 वर्षांच्या कारकिर्दीत क्रिकेट खेळणार्‍या प्रत्येक देशाचा दौरा केलाय..आणि या सगळया दौर्‍यात आलेले अनुभव या साईटमध्ये आहेत..भरपूर चित्रं, काही एक्सक्लुजिव्ह व्हिडिओ आणि सगळ्या देशात लेले यांना भेटलेली कलंदर माणसं या वेबसाईटमध्ये लेले यांनी बंदिस्त केलीत…सचिन तेंडुलकर लेले यांचा आवडता क्रिकेटर..त्याच्याविषयी छोटं पुस्तक निघेल एवढे लेख या साईटवर आहेत. सचिनचा त्याच्या कुटुंबियांवरचा हा दुर्मीळ फोटो पहा..सचिनचेच नाही तर सगळ्याच भारतीय क्रिकेटर्सवर लेलेंनी लिहिलेले लेख आणि त्यांचे दुर्मीळ फोटो तुम्हाला इथं दिसतील..आणि दुर्मीळ व्हिडिओ ही..या साईटचं वेगळेपण म्हणजे क्रिकेट कव्हर करता करता वेगवेगळ्या देशात आलेले अनुभव आणि तिथं भेटलेली क्रिकेट बाहेरची माणसं यांवरचे लेखही या साईटवर आहेत. थोडक्यात सुनंदन जिथे जिथे क्रिकेट कव्हर करायला गेल किंवा जाणारएत तिथे तिथे ते या साईटच्या माध्यमातून तुम्हाला नेणारएत. www.sunandanlele.com असा या साईटचा ऍड्रेस आहे..आणि आताही ही साईट इंटरनेटवर उपलब्ध असली, तरी ऑफिशिअली उद्या सचिन तेंडुलकरच्या हस्ते ख्राईस्टचर्चला साईटचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

close