लोकमान्य टिळक शिक्षण संस्थेनं केलं विद्यार्थ्यांचं नुकसान

March 6, 2009 4:14 PM0 commentsViews: 16

6 मार्च , जालनाजालना जिल्ह्यातील सेवलीच्या लोकमान्य टिळक शिक्षण संस्थेचा बोगस कारभार समोर आलाय. लोकमान्य टिळक शिक्षण संस्थेला बोर्डानं दहावी आणि बारावीसाठी फक्त 288 विद्यार्थ्यांची परवानगी दिली होती. पण संस्थेनं विद्यार्थ्यांकडून भरमसाट फी घेवून एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिली. अतिरिक्त विद्यार्थ्यांना बोर्डानं परीक्षेला बसण्याची परवानगी नाकरली. त्यामुळं या विद्यार्थ्यांचं मोठ शैक्षणिक नुकसान झालं आहे.आता शिक्षणाधिकार्‍यांनी या संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव बोर्डाला पाठवालाय. तर शालेय शिक्षण मंत्र्यांनी संस्थाचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवलीया. पण संस्थेच्या या बेजबाबदारपणामुळं विद्यार्थ्यांना मात्र वर्षभर घरी बसावं लागलंय.

close