नांदेडमध्ये संस्थाचालकांनी प्राध्यापकांवर केले अत्याचार

March 6, 2009 4:19 PM0 commentsViews: 2

6 मार्च नांदेडमधल्या वसंतराव नाईक विद्यालयातल्या बी.एस्.सी प्रॅक्टिकलच्या परीक्षेत एक धक्कादायक प्रकार घडलाय. या परीक्षेला संस्थाचालक श्रीनिवास जाधव यांची पत्नी गैरहजर होती. तिच्या ऐवजी डमी विद्यार्थ्याला बसू द्यावे अशी मागणी संस्थाचालकांनी केली. पण ही मागणी प्राध्यापकांनी अमान्य केली. त्यामुळे चिडलेले संस्थाचालक श्रीनिवास जाधव यांनी या दोघांना एका खोलीत कोंडलं. या दोन प्राध्यापकांवर त्यांनी ऍसिडही फेकलं. या प्रकरणात संस्थाचालक श्रीनिवास जाधव आणि त्यांच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

close