मुंबई विद्यापीठानं मनसेच्या विद्यार्थीसेनेवर घातली बंदी

March 6, 2009 4:24 PM0 commentsViews: 2

6 मार्च, मुंबईमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेवर मुंबई विद्यापीठानं बंदी घातलीय. ही बंदी एक वर्षासाठी आहे. याआधी मराठीच्या मुद्द्यावरून मनविसेनं विद्यापीठात धुडगूस घातला होता. विशाल या घटनेची राज्यपाल एस. सी. जमीर यांनी पाहणी करून दखल घेतली होती. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलीय. बंदीच्या काळात मनविसेच्या पदाधिकार्‍यांना विद्यापीठाच्या प्रशासनाशी कोणतीही चर्चा करता येणार नाही.

close