मंदीत निवडणूक प्रचार साहित्यांना जोरात मागणी

March 6, 2009 4:27 PM0 commentsViews: 5

6 मार्च, मुंबईउदय जाधवपंधराव्या लोकसभेसाठी निवडणुकांच्या तारखा घोषीत झाल्यात. त्यामुळं प्रचार साहित्याला मागणी वाढू लागलीय. विशाल बाजारात सध्या मंदी आहे. पण राजकारण्यांना या मंदीचं काहीही सोयरसुतक दिसत नाही. त्यांची खरेदी तेजीतच आहे. शिवसेना… काँग्रेस… भाजप… राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे… या राजकीय पक्षांना प्रचार साहित्य पुरवणारे नरेश शेरला. गेली वीस वर्ष ते हा व्यवसाय करतायत. आचारसंहितेची मर्यादा असली तरी, प्रचार साहित्यासाठीचं बजेट मात्र कमी झालेलं नाही. ताई माई अक्का… विचार करा पक्का… आणि आमच्याच निशाणीवर मारा शिक्का. अशा घोषणा देत, लोकसभेच्या पाचशे पंच्चेचाळीस जागांसाठी, अनेक उमेदवार निवडणुका लढवणार आहेत. पंधराव्या लोकसभेसाठी देशभरात पाच टप्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्तानं मंदीतही अनेक हातांना काम मिळालंय.

close