गांधीजींच्या वस्तू विजय माल्ल्यांनी खरेदी केल्या

March 6, 2009 4:36 PM0 commentsViews: 5

6 मार्च, न्यूयॉर्क न्यूयॉर्कमध्ये गांधीजींच्या वस्तूंना उद्योगपती विजय मल्ल्यांनी 18 लाख डॉलरमध्ये विकत घेतलं आहे. काल न्यूयॉर्कमध्ये गांधीजींच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला. गांधीजींच्या वस्तूंना मल्ल्या लवकरच भारत सरकारच्या ताब्यात देणार आहेत अशी माहिती मिळालीय पण गांधीजींच्या या वस्तू दोन आठवड्यानंतर त्यांच्या ताब्यात मिळणार आहे. सुरुवातील न्यूयॉर्कमध्ये होणारं गांधीजींच्या वस्तूंचा लिलाव थांबवायला या वस्तूंचा मालक जेम्स ओटीस तयार झाला होता. पंतप्रधान मनमनोहन सिंग यांचे आदेश आणि लोकांचा वाढता दबाव यामुळे परराष्ट्र मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयानं पावलं उचललीयत. काही झालं तरी बापूजींचा अनमोल ठेवा मायदेशी परत आणायचाच असा निर्धार त्यांनी केलाय. त्यासाठी एनआरआय चीही मदत घेतली जाणार आहे. गांधीजींच्या वस्तू लिलावातून वाचवण्यासाठी भारत सरकारनं उशीरा पावलं उचलल्याचं गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी म्हटलंय.

close