आयसीआय बँकेच्या होमलोन व्याज दरांत घट

March 6, 2009 4:47 PM0 commentsViews: 3

6 मार्च, मुंबई आयसीआयसीआय बँकेनं होमलोनच्या दरात घट केली आहे. बँकेनं यासंदर्भात नवे स्लॅब्स दिलेत. त्यानुसार वीस लाखांपर्यंत कर्ज घेणार्‍या ग्राहकांना पावणे दहा टक्के व्याजदर आकारला जाईल. 20 ते 30 लाखांपर्यंत कर्ज घेणार्‍या ग्राहकांना 10 टक्के तर 30 लाखांच्या वर कर्ज घेणार्‍यांना साडे अकरा टक्के व्याजदर आकारला जाईल. हे व्याजदर नवीन होमलोन घेणार्‍या ग्राहकांनाच लागू आहेत. रिझर्व्ह बँकेनं दोन दिवसांपूर्वीच रेपो रेटमध्ये घट केली होती. त्यामुळं अनेक सरकारी बँकांनी व्याजदर कमी केले. मात्र खाजगी बँकांनी मात्र सावध पवित्रा घेतला होता. पण आज आयसीआयसीआय बँकेनं व्याजदर कमी केलेत. त्यामुळं यापाठोपाठ अनेक खाजगी बँकाही व्याजदर कमी करतील असे संकेत दिलेत.

close