बेळगावात चीन – भारतीय लष्कराचा संयुक्त सराव

December 7, 2008 3:45 PM0 commentsViews: 2

7 डिसेंबर, बेळगावभारत आणि चीनदरम्यानच्या लष्करी कवायतींना शनिवारपासून बेळगाव मराठा इन्फन्ट्रीमध्ये सुरुवात झालीय. भारताच्या भूमीवरची ही पहिलीच भारत- चीन लष्करी कवायत आहे. या कवायतींना 'शत्रूजित 2' असं नाव देण्यात आलं आहे. 2006 मध्ये भारत आणि चीन यांच्यात लष्करी देवाणघेवाणीचा समन्वय करार झाला. यात प्रामुख्याने दहशतवादाविरुद्ध लढा देण्याच्या प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आलाय. या कवायती त्याचाच एक भाग आहे. गेल्या वर्षी भारत अमेरिका कवायतीत पंजाब रेजिमेंटच्या जवानांनी भाग घेतला होता. यंदा कवायतीत मराठा बटालियनच्या जवानांनी भाग घेतलाय. 1962 च्या युध्दानंतर भारत – चीन संबंध बिघडले होते. अरुणाचल, सिक्कीमवर चीन मधून मधून दावा सांगत असतो. या पार्श्वभूमीवर या लष्करी सरावाला महत्त्व आलंय.

close