नशीबानं आम्हाला साथ दिली – ऑस्ट्रेलियन अंपायर

March 6, 2009 4:52 PM0 commentsViews: 3

6 मार्च श्रीलंकेच्या टीमवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता श्रीलंकन टीम मायदेशी परतलीये. आणि त्याचबरोबर अंपायर सायमन टॉफेल आणि स्टीव्ह डेव्हिसही मायदेशी ऑस्ट्रेलियाला परतलेत. पण पाकिस्तानात टीमला आणि अधिकार्‍यांना अजिबात नीट सुरक्षाव्यवस्था पुरवली नव्हती अशी खंत त्यांनी व्यक्त केली.ऑस्ट्रेलियन टीमनं 1998नंतर पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या अंपायरला मात्र ती मुभा नाहीये. सायमन टफेल आणि स्टीव्ह डेव्हिस या आयसीसीच्या अंपायर्सना पाकिस्तानचा दौरा करण्यावाचून गत्यंतरचं नव्हतं. पण या दौर्‍यात मैदानावरचा खेळ त्यांच्या जिव्हारी आला. "आम्हाला पुरेशी सुरक्षा नव्हती, " अशी माहिती अंपायर सायफन टॅफेल यांनी दिली. " नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, " अशी प्रतिक्रिया अंपायर स्टीव्ह डेव्हिस यांनी दिली. या हल्यात जखमी झालेले त्यांचे सहकारी अंपायर पाकिस्तानचे एहसान रजा हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झुंज देतायत. त्यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा यासाठी ते प्रार्थना करत असले तरी त्यांचा राग मात्र काही कमी होत नाहीये. ख्रिस ब्रॉडनं आपला राग व्यक्त केला असला तरीही पीसीबीकडून याप्रकरणाची गांभीर्यानं अजिबात दखल घेतली गेली नाही.या हल्ल्यातून श्रीलंकन खेळाडू, हे सर्व अंपायर्स आणि इतर अधिकारी सावरत असले तरीही जागतिक क्रिकेट हे कायमसाठी बदललयं हे नक्कीच

close