अच्युत गोडबोलेंबरोबर ग्रेट भेट

October 14, 2008 1:30 PM0 commentsViews: 285

जगभरात नावलौकिक मिळवलेले आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांची सामाजिक प्रश्नांविषयी असलेली संवदेनशीलता ' ग्रेट भेट ' मध्ये उलगडली गेली. शहाद्यात आदिवासींसाठी त्यांनी काम केलं. दरम्यान, त्यांच्या आयुष्याला एका घटनेनं कलाटणी दिली. नोकरीच्या शोधात ते बाहेर पडले. विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावलेले पण आदिवासींसाठी काम केलं असं सांगताच नोकरी नाकारली जायची. एखादी गोष्ट आपल्याला येत नाही कळाल्यावर ती जिद्दीने शिकण्याचा बाणा गोडबालेंच्या अंगी आहे. आयुष्य स्थिर होण्याच्या मार्गावर असताना अच्युत गोडबोलेंवर दु:खाचा डोंगरच कोसळला. मुलगा निहारला ऑटिझम असल्याचं निदान झालं. त्याही परिस्थितीत अंगी जिद्द बाळगली. ' बिचारा निहार आणि त्याचे बिचारे वडील अशी ओळख मला नको होती ', असं मुलाखतीत गोडबोले म्हणाले. ते त्यांनी जिद्दीनं करून दाखवलं. ऑटिस्ट मुलांसाठी महाराष्ट्रातील पहिली शाळा अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीनं सुरू केली. अच्युत गोडबोलेंच्या आयुष्यातील अनेक पैलु ' ग्रेट-भेट ' मध्ये उलगडले गेले.

close