कमांडो येईपर्यंत मुंबई पोलिसांची झुंज

December 7, 2008 1:53 PM0 commentsViews: 6

7 डिसेंबर मुंबई मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला चढवला. ताज, ओबेरॉय, नरिमन हाऊस आणि सीएसटी रेल्वे स्थानकावर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला,हातबॉम्ब टाकले. बुधवार 26 नोव्हेंबरची रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाही. त्या रात्री अतिरेक्यांनी देशावर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला चढवला.या हल्ल्यात सर्वात जास्त नुकसान झालं ते ताज हॉटेलचं. बुधवार रात्री 9.40 वाजता अतिरेकी लिओपोर्ड हॉटेलच्या दिशेने गोळीबार करत ताजमध्ये शिरले आणि त्यानंतरचा थरार सर्वांनीच पाहिला. अतिरेक्यांविरुध्दच्या या कारवाईत मोठी भूमिका होती ती म्हणजे मुंबई पोलिसंची. डीसीपी झोन एक ची.अतिरेक्यांच्या मागे मुंबई पोलीसही ताजमध्ये शिरलेआणि तेही एक पिस्तूल घेऊन. आणि एन एस जी कमांडो येईपर्यंत मुंबई पोलीस अतिरेक्यांशी झुंज देत राहीले.त्यावेळच्या परिस्थितीबाबत पोलीस उपायुक्त, विश्‍वास नांगरे पाटील सांगतात, आम्ही नाइट राउडच्या तयारीत होतो. इतक्यात रात्री 9.40 वाजता अतिरेकी लिओपोर्ड हॉटेलच्या दिशेने गोळीबार करत ताजमध्ये शिरले अशी माहिती मिळाली. 9.55मिनिटांनी आम्ही तिथे पोहचलो. आणि जिथे फायरिंग चालू आहे तिथे गेलो दुस-या मजल्यावरून आम्हाला 3 अतिरेकी दिसले. आम्ही त्यांच्यावर फायरिंग केलं त्यात एका अतिरेक्याच्या पायाला गोळी लागली. त्यांनीही आमच्या दिशेने फायरिंग सुरू केली. त्यांचा पाठलाग करीत आम्ही पाचवा, सहावा मजला गाठला परत वरून खाली येताना त्यांनी आमच्यावर ग्रेनेडचा हल्ला केला. आम्ही पुन्हा एसआरसीएफ जवानासोबत ताजमध्ये गेलो. यावेळी आम्ही त्यांना पाहू शकलो नाही. परंतु त्यांना वरच्या मजल्यावर रोखून धरलं. साधारणत: 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यत दोन्हीकडून फायरिंग चालू होतं. यावेळात ताजमधल्या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर कमांडो आले.एन एस जी कमांडो आल्यानंतर अगदी धाडसाने त्यांनी अतिरेक्यांचा सफाया केला. पण, कमांडो येईपर्यंत त्यांना रोखून धरण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलं.

close