दिवाळीचा फराळ – पाककलातज्ज्ञ उषा पुरोहित

October 18, 2008 7:43 AM0 commentsViews: 795

दिवाळी जवळ यायला लागली आहे, त्यामुळे घराघरांत फराळाची लगबग सुरू आहे. दिवाळीचा फराळ उत्तम व्हावा यासाठी अनेक लहान सहान गोष्टींची काळजी घ्यावी लागते.आणि याबद्दलच्या टिप्स जाणून घेण्यासाठी आजच्या 'टॉक टाइम'च्या भागात पाककलातज्ज्ञ उषा पुरोहित आल्या होत्या. त्यांनी दिवाळीत फराळ करताना काय काळजी घ्यायची आणि तो कधीपासून करायला सुरुवात करायची इथपासून सविस्तर माहिती सांगायला सुरुवात केली. दसरा झाल्यावर सर्वातआधी अनासाशांच्या तयारीला लागायचं. कारण अनारसे करायल सर्वात जास्त वेळ लागतो. दस-सापासून अनारशांचं पीठ करायला घेतलं तर ते चांगलं मुरतं आणि ते खुसखुशीत लागतात. वसुबारसेपासून नंतर हळुहळु प्रत्येक पदार्थ करायला सुरुवात करावी.' दिवाळीच्या फराळांमध्ये बहुतेकांना बेसनाचे लाडू आवडतात. उषाताईंनी बेसनाच्या लाडुंची रेसिपी सांगितली. बुरा शक्कर कशी करतात तेही सांगितलं. बहुतेक गृहिणींच्या चकल्या फसफसतात. नरम पडतात. अशावेळी चकल्या करताना कोणती काळजी हेही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात उषा ताईंनी दिवाळीचा फराळ करताना टिप्स दिल्या. त्या पुढीलप्रमाणे -1. बेसनचे लाडू करताना बुरा शक्कर घातल्यानं चवीला चांगले होतात.2. करंजी किंवा चिरोट्यात साजूक तुपाचं मोहन घालावं.3. करंजी रिफाईंड तेलात तळावी.4. पाकाचे लाडू करताना आधी पाणी उकळावं, मग त्यात साखर घालावी.5. चिरोट्याच्या साठ्यात चमचाभर पिठी साखर घालावी.6. चकलीसाठी धान्य जास्त भाजू नये.7. कमी तुपात बेसन लाडू करण्यासाठी आधी डाळ भाजून घ्यावी आणि मग मिक्सरवर बारिक करावी.8. फराळ करताना शुगर फ्रीचा वापर करावा.9. चिवड्याला तुपाची फोडणी द्यावी10.चिवड्यात कडुलिंब बारीक चिरून घालावं.आजच्या टॉक टाइमध्ये त्यांना वाचकांनी निरनिराळे प्रश्न विचारले. शेजारी क्लिक केल्यावर टॉकटाईमचा काही भाग पाहता येईल.हा भाग आज संध्याकाळी 4.30 वाजता पाहिता येईल.

close