ग्रेट व्यक्तिमत्त्व- निळू फुले

October 20, 2008 1:04 PM1 commentViews: 668

मराठी चित्रपटातील गावचा पाटील असो नाही तर सरपंच आजही ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्याशिवाय ती भूमिका कोणी साकारू शकेल, असं वाटत नाही. अभिनयात ग्रामीण ढंग आणि रांगडी भाषा निळू फुले यांची ओळख आहे.' सामना ' चित्रपट बॅलिर्न फेस्टिव्हलमध्ये दाखवल्यानंतर तिथे चित्रपटरसिकांच्या नजरा 'हिंदुराव पाटील' ला शोधत होत्या. पडद्यावरील दिसणारं व्यक्तिमत्त्व समोर असुनही ते दिसत नव्हतं. यांचं कारण निळू फुले यांचं साधं व्यक्तिमत्त्व निळू फुले यांनी नमस्कार करताच थिएटरमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. अशा या ग्रेट व्यक्तिमत्त्वाची मुलाखत ' ग्रेट भेट ' मध्ये आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी 11 ऑक्टोबरला घेतली.

  • Deepak Chougule

    please upload full interview of neelu bhau

close