पाणलोटाचा जोहाड

October 18, 2008 3:54 PM0 commentsViews: 11

धार्मिक स्थळांवर भरणारे महाकुंभमेळे आपण सर्वांनीच पाहिले आहेत. पण पहिल्यांदाच राजस्थानातल्या करोली जिल्ह्यात 'जलकुंभ मेळा' भरला आहे. एकाबाजुला चंबळचं खोरं, एका बाजुला रणथंबोरचं अभयारण्य आणि मधोमध असलेल्या खिजुरा गावामध्ये जलकुंभमेळा भरला होता. माहेश्वरीन नदीचा पुनर्जन्म साजरा करण्यासाठीच हा कुंभमेळा भरला होता. दहा हजारांपेक्षा जास्त लोक या जलकुंभमेळ्यासाठी आले होते. या सर्वांपाठी होते ते मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंग. पाणीच नसलेल्या तसंच दरोडेखोरांच्या प्रदेशात राजेंद्र सिंग यांनी पाणी आणि त्यायोगे पर्यायाने रोजगार आणला. अशा अशा पाणीवाल्या बाबाच्या पाण्याच्या क्रांतीचं महत्त्व सांगणारा हा रिपोर्ताज –

close