हाडांचे किमयागार डॉ.नंदू लाड

October 18, 2008 4:56 PM0 commentsViews: 40

डॉ. नंदू लाड देशातील नावाजलेले अस्थिरोग तज्ज्ञ. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांच्या चमूपैकी ते एक होते. आरोग्यसेवा हीच सेवा मानणारे डॉ. नंदू लाड यांची मुलाखत आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतली.भारतातील आरोग्य व्यवस्थेबाबत त्यांनी मुलाखतीत चिंता व्यक्त केली. ' क्युबामध्ये 17% खर्च आरोग्य सुविधांवर केला जातो. आपल्याकडे किती केला जातो. एअरकंडिशन रुममध्ये बसून हे सारं ठरवलं जातं. तळागाळात काम करणारे डॉ. अभय बंग आणि डॉ. प्रकाश आमटेंना विचारलंही जात नाही ', असं डॉ. नंदू लाड कळकळीनं सांगत होते. लोकांच्या सहभागातून त्यांनी सुश्रुषा हॉस्पिटल उभारून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

close