‘ ग्रेट-भेट ‘ मध्ये नामदेव ढसाळ

October 19, 2008 9:49 AM0 commentsViews: 428

गोलपीठा आणि नामदेव ढसाळ हे समीकरण अजुनही साहित्य क्षेत्रातच नव्हे तर सर्वसामान्यांमध्ये अबाधित आहे. ' गोलपीठा ' प्रकाशित होताच साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली होती. ' ग्रेट-भेट ' कार्यक्रमात बोलताना कवी नामदेव ढसाळ म्हणाले, प्रस्थापित साहित्याविरोधात हे पुकारलेलं बंड नव्हतं. ते ठरवून केलं असतं तर प्रचारकी झालं असतं.नामदेव ढसाळ यांची ही प्रतिक्रिया बोलकीच नाही तर अस्पृश्यतेची झळ सोसलेल्या एका दलिताचं प्रतिबिंब दर्शवते. पुण्यातील एक लहान खेडं ते मुंबईपर्यंतचा नामदेव ढसाळ यांचा प्रवास थक्क करणारा आहे. लहानपणी शाळेत अस्पृश्यता अनुभवलेल्या नामदेव ढसाळ यांनी मुंबईत टॅक्सीही चालवली. कविता करणं हा उपजत गुण नामदेव ढसाळांच्या अंगी होता. मुंबईत आल्यानंतरही कविता करणं सुरुच होतं. त्यानंतर नामदेव ढसाळांच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरं आली. या अशा अनेक गोष्टी ' ग्रेट भेट ' मध्ये उलगडल्या गेल्या.

close