ग्रेट भेट : मृणाल गोरे

July 17, 2012 1:33 PM0 commentsViews: 244

सर्वसामान्यांचा आवाज अशी मृणाल गोरे यांची ओळख आहे. याशिवाय ' पाणीवाली बाई ' ही ओळख न पुसता येण्यासारखी आहे. एकेकाळी गोरेगाव ही मोठी ग्रामपंचायत होती. विहिरीवर ग्रामस्थांचं पाणी भरुन व्हायचं. पण लोकसंख्या वाढल्यावर हे पाणी कमी पडू लागलं. तेव्हा मृणाल गोरे यांनी महापालिकेकडे पाण्याची मागणी लावून धरली. मूलभूत प्रश्नांवर महिलांना एकत्र आणलं.सध्याचे नेते मराठीच्या मुद्यावर राजकारण करत आहेत पण मृणाल गोरे यांनी सर्वात आधी महापालिकेचा कारभार मराठीत करण्याची मागणी केली होती. राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार ही पदं भूषवली तरीही मृणाल गोरे यांना विरोधी पक्षनेता पद जास्त आवडतं. 'लोकांचे प्रश्न मांडता येतात, असं मृणाल गोरे मुलाखतीत म्हणाल्या. राजकीय कारकिर्दीत अनेक संकटांचा त्यांनी प्रभावीपणे सामना केला. मृणाल गोरे यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मुलाखतीत उलगडले गेले.

close