क्षण टिपणारे छायाचित्रकार मोहन बने

October 19, 2008 11:43 AM0 commentsViews: 4

नुकतीच ऑलिम्पिक स्पर्धा झाली. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने चांगली कामगीरी केली आहे. प्रत्येक भारतीयाला ते याची देही याची डोळा पाहायचं होतं.ज्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं नाही ते पूर्ण केलं क्रीडा छायाचित्रकार मोहन बने यांनी. नुकतच त्यांचं मुंबई मराठी पत्रकारसंघात यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्याछायाचित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. असंख्य क्रीडाप्रेमींनी छायाचित्रकारांनी या प्रदर्शनाला उपस्थिती लावली होती. छायाचित्रकार मोहन बने यांनी अशा असंख्य क्रीडा स्पर्धांची पर्वणी आपल्या लेन्स आणि कॅमे-याच्या मदतीने लोकांना उपलब्ध करून दिली आहे. तर आजच्यासलाम महाराष्ट्रमध्ये क्रीडा छायाचित्रकार (स्पोर्ट्स फोटोग्राफर) मोहन बने आले होते. क्षण टिपण्याचं कसब असणा-या छायाचित्रकाराशी साधलेला संवादक्लिक करा आणि ऐका –

close