जॅझ म्युझिकची जान- ध्रुव घाणेकर

October 22, 2008 8:48 AM0 commentsViews: 4

युथ टयुबच्या या इपिसाडमध्ये ओळख करून घेऊया ध्रुव घाणेकरशी. तो सुंदर गिटार वाजवतो. त्याने अनेक अ‍ॅडसाठी जिंगल्सही तयार केल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे द्रोणा फिक्चरला त्याने म्युझिकही दिलेलं आहे. ध्रुवचे जगभरात परफॉर्मन्स होतं असतात. भारतातल्या जॅझ् म्युझिकची तो जान आहे. म्युझिक इंप्रोवायझेशन करणं ही ध्रुवची खासियत आहे. त्याने बॉम्बे बॉइज, तम्मन्ना या फिल्मसाठी म्युझिक दिलेलं आहे. ध्रुव लहानपणापासूनच गातो. दिवसातून सात-आठ तास त्याने म्युझिकवर मेहनत घेतली. स्मोक बॅन्डपासून त्याने सुरवात केली. चक्रव्यूह ग्रुपचा तो मुख्य भाग होता. त्याने आता मित्रांबरोबर ब्लू फ्रॉग नावाची म्युझिक कंपनी उभारली आहे. त्याच्या स्टुडिओत नाईट क्लब, म्युझिक रेकॉर्डिंगची सोय आहे. सिंगर, गिटारीस्ट, म्युझिक कंपोझर अशा वेगवेळया क्षेत्रात ध्रुव यशस्वी झाला आहे.आयुष्यात सर्वकाही सुरळीत चालत असताना वेगळी वाट धरावी असं ध्रुवला वाटतं. असा आहे ध्रुव घाणेकर.

close