कोल्हापूरमध्ये 66 तास अखंड भरतनाट्यम नृत्याचा विक्रम

December 7, 2008 4:55 PM0 commentsViews: 10

7 डिसेंबर, कोल्हापूर प्रताप नाईकभरतनाट्यम नृत्याच अखंड 66 तास सादरिकरण करून कोल्हापूरच्या संयोगिता पाटील हिनं विक्रम स्थापन केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये व्हावी म्हणून ती प्रयत्न करत आहे.कोल्हापूरची नृत्यचंद्रीका संयोगिता पाटील हीने अखंड 66 तास नृत्यातील रचना, हस्तमुद्रा, चेहर्‍यावरचे हावभाव यामुळे तीने सर्वांची मनं जिंकून घेतलीयत. इतकंच नाहीतर सलग 66 तास नृत्याचं सादरिकरण करून तिनं एक प्रकारचा विक्रमही स्थापन केलाय. संयोगिताच्या या उपक्रमासाठी तिच्या आईनेही खूप कष्ट घेतले आहेत. " दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी संयोगिताने हा विक्रम केला. त्यावेळी तिचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अथक परिश्रमामुळेच तीने हा विक्रम केल्यानं तिच्या गुरूंनाही तिचा अभिमान वाटतोय, " असं संयोगिताचे गुरू टी. रविंद्र शर्मा म्हणाले. आपल्यासारख्याच नृत्यउपासकांसाठी नृत्यशाळा स्थापन करण्याची संयोगिताची इच्छा आहे. संयोगिताच्या भरतनाट्यम नृत्याचा हा विक्रम येत्या काही दिवसांमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदवला जाईल.

close