आम्ही मराठी मुस्लीम

October 20, 2008 1:16 PM0 commentsViews: 71

माणसामाणसातला फरक कळतो तो देश, धर्म यांतून. पण भाषेचं असं नसतं. कारण भाष ह्या सर्व अस्मितांना आपापल्या पोटात घेते. महाराष्ट्रात राहणारा हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो मराठी मातीने ह्या सगळ्यांच्या अस्मिता हसत हसत पोटात घेतल्या आहेत. इथला मुसलमान मराठी मातीत कसा काय रूजला आणि त्याच्याबरोबर मराठी भाषा कशी रूजली याचा वेध घेतला गेला ते त्यांच्या संस्कृतीत जाऊन. आणि त्याचं निमित्त ठरला तो रमझानचा पाक महिना. रोझाच्या या पाक महिन्यात भेटली हाजी इम्तियाज पालकर, अब्दुल कादर मुकादम, हमीदा हसवारे, अनिसभाई, नईम अहमद सुरती, निलोफर हमदुले, शबनम कारभारी, फातीमा रहेमान, खालदा बानू, अनिस अतार, शरीफभाई सारखे मुरुड, मालेगाव, औरंगाबाद, चौल या ठिकाणी राहणारे मुस्लिम बांधव. यांचे सगळे व्यवहार मराठीतूनच होत आहेत. आपण मराठी मातीत किती एकरूप होऊनपुढारलेल्या विचारांचे आहोत हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गीता आणि कुराणचा मिलाफ पहायला मिळाला. हे सगळं पाहताना एक गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे महाराष्ट्रातला मुसलमान मराठीपणात एकरूप होऊन गेला आहे. समाजातल्या चालीरिती आणि परंपरा ह्यांचा संबंध समाजाच्याबाहेरही येतो. समाजातली हीच सरमिसळ या दोघांमधला दुवा ठरली आहे. हा दुवा असाच कायम राहो अशी दुवा करायला काहीच हरकत नाही.

close