हॅपनिंग करिअर – इव्हेंट मॅनेजमेंट

October 26, 2008 10:17 AM0 commentsViews: 46

आजच्या या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ब्रॅण्ड घराघरात पोहोचवण्याचं सगळ श्रेय इव्हेंटस् मॅनेजरचं आहे आणि वाढत्या इव्हेंटसबरोबर या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना अधिकाधिक प्राधान्य मिळत आहे. कोणत्याही इव्हेंटस्‌साठी गरज आहे ती कोऑर्डिनेशन आणि मॅन मॅनेजमेंटची म्हणजे व्यक्तींकडून करुन घेण्यात येणार्‍या कामाच्या व्यवस्थापनाची. जर ते एखाद्याला नीट जमलं तर तो माणूस अगदी हसत हसत कोणतंही काम करू शकतो. नेमक हेच ' टेक ऑफ ' या व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमात सांगण्यात आलं. इव्हेंट मॅनेजमेंटविषयी चर्चा करण्यासाठी टेक ऑफ मध्ये '77' चे डायरेक्टर मनोज गोपलानी आणि नॅशनल इन्स्टिट्यूटचे को-ऑर्डिनेटर सुदीप पाटील यांनी भाग घेतला होता. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करतो. त्याची माहिती पुढीलप्रमाणे1. डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंटकालावधी 1 वर्ष (पार्ट टाइम)फी – 40 हजार 2. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंटकालावधी 1 वर्ष (पार्ट टाइम)फी – 50 हजार

इव्हेंट मॅनेजमेंटचं प्रशिक्षण खालील संस्थांमध्ये दिलं जातं.

1. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट , मुंबई .फोन नं. – 91 22- 2671 6676 / 91 22 – 2628 2928ई-मेल- support@niemindia.com

2.एसएनडीटी विद्यापीठ , मुंबई .फोन नं.- 022-26608045वेबसाईट – sndt.digitaluniversity.ac

3.लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर.फोन नं.- 0712 – 2538877, 2543896 वेबसाईट – www.naemd.com

4. इव्हेंट मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, पुणेफोन नं.- 91 20 25720324

5. भगवानदास पुरोहित कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट ,नागपूर.फोन नं. – 0712-2522341

close