गुरू-ता- गद्दी सोहळा

October 27, 2008 4:02 PM0 commentsViews: 18

शीख बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या गुरू ग्रंथसाहेब या ग्रंथाला गुरुस्थान प्राप्त होऊन यंदा 300 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं गुरू- ता-गद्दी समारंभाची त्रिशताब्दी नांदेडला साजरी होत आहे. त्यानिमित्त नांदेडध्ये गुरू -ता- गद्दीच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. शीख धर्मियांच्या आयुष्यात या सोहळ्याचं नेमकं काय महत्त्व आहे, हे या रिपोर्ताजमध्ये पहा.शीख समाजात व्यक्ती पुजेला स्थान नाही. व्यक्तीपूजा नको म्हणूनच गुरू गोविंदसिंग यांनी गुरु परंपरा थांबवली. त्यामुळे ग्रंथसाहेबमधील अभंगानुसार आचरण करण्याकडे शीख समाजाचा ओढा असतो. महाराष्ट्रांचे आणि शिखांचे संबंध संतकाळापासून आहेत. नामदेव हे सबंध उत्तर भारताला ज्ञात असलेले आद्य संत आहेत. त्यांनी निर्गृण निराकार परब्रम्ह, सगुण आणि निर्गृण हे उत्तर भारतात विशेषत: वायव्य भारतात जाऊन पहिल्यांदा सांगितलं. नामदेवांनी अत्यंत व्यावहारिक पातळीवर जात पात नको, एक ईश्वर मानणं, देवाच्या नावानं कर्मकांड न करणं, कुठल्याही अंधश्रध्दा न ठेवणं, अशी अगदी मुलभूत शिकवण, पुढे जी कबीर दास, तुकारामांनी सांगितली. हे सगळं नामदेवांच्या कवितेतून आणि विशेषत: हिंदी कवितेतून उत्तरेला मिळाली. गुरू-ता- गद्दी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातुनच नव्हे तर देशभरातून शीख बांधव नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. यानिमित्तानं सोहळ्याचं शीख धर्मामधील महत्त्व रिपोर्ताजमध्ये दाखवण्यात आलं.

close