भारत-इंग्लंड दरम्यानच्या पहिल्या टेस्टसाठी चेन्नई सज्ज

December 7, 2008 8:42 AM0 commentsViews: 2

7 डिसेंबर चेन्नईभारत-इंग्लंड दरम्यान होणा-या पहिल्या टेस्टसाठी चेन्नई सज्ज झाली आहे. दोन्ही टीमची चेन्नईमधल्या ताज कोरोमंडल या फाईव्हस्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. 8 ते 15 डिसेंबर या कालावधीत दोन्ही टीमचे क्रिकेटपटू येथे राहणार आहेत. दोन्ही टीमचे तीस खेळाडू, स्पोर्ट्स स्टाफ आणि काही पदाधिकारी यांच्यासाठी हॉटेलचे सर्व म्हणजे 213 रूम बुक करण्यात आल्या आहेत. प्रत्येक रूमचं 600 अमेरिकन डॉलर्स एवढं भाडं असून आठ दिवसांचा खर्च 8 कोटींच्या घरात जातो. हॉटेलबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ठिकठिकाणी एनएसजीचे कमांडो तैनात करण्यात आली आहे. याशिवाय ताज कोरोमंडलची स्वत:ची सुरक्षा यंत्रणाही काम करणार आहे. बीसीसीआयच्या परवानगीशिवाय या हॉटेलमध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

close