करिअर कॉमर्समधलं

November 2, 2008 1:44 PM0 commentsViews: 5

1 नोव्हेंबरपासून सीएच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे 'टेक ऑफ' चार्टड अकांउंटन्सीची परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्या दिवशीचा टेक ऑफ' हा 'कॉमर्समधलं करिअर' या विषयावर आधारित होता. सायन्सनंतर विद्यार्थी वळतात ते कॉमर्सकडे आणि एकदा कॉमर्सचा अभ्यास सुरू केला की विद्यार्थ्यांना सीए व्हावसं वाटतं. सीएचा हा कोर्स विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे. ते कसं हे या भागातून दाखवलं आहे. प्रोफेशनमध्ये आल्यावर अनेक कंपन्यांची, सेक्टरची माहिती मिळू शकते. अनेक लोकांचे कॉन्टेक्ट वाढतात. सीएची डीग्री ग्रॅज्यूएशन करतानाचं मिळू शकते. सीएचा हा कोर्स बेस्ट असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. सीएच्या परीक्षेचा रिझल्ट एक ते दोन टक्केच लागतो. कारण, इतर परीक्षेप्रमाणं सीएच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा पॅटर्न नसतो.त्यामुळं इथं कोणताही टॉपिक ऑपशनला टाकता येत नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांना टॅक्स, कॉस्टींग या प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करण महत्त्वाचं ठरतं. त्याचप्रमाणं सीएच्या कोर्समध्ये इन्डीव्हिज्यूएल आणि इंडस्ट्रीयल सीए असे दोन भाग पडतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वत:ची फर्म चालवता येते. तर एखाद्या कंपनीत नोकरी करता येते. त्यातही कंपन्याा कॅम्पस इन्टरव्ह्यूमध्‌ून चांगल्या कॅन्डीडेट्सची निवड करून भरभक्कम पगार देतात. कंपन्या कॅम्पस इन्टरव्हू मधून विद्यार्थ्यांना उचलतात. आणि भरभक्कम पगार देतात. वयाच्या एकविसाव्या वर्षी जर त्यांना 3/4 लाख पगार असेल तर त्यांच्या भविष्य किती चांगल असेल त्याची यावरून कल्पना येईल. या भागाविषबाबत वरच्या व्हिडिओवर क्लिक करून पाहता येईल.

close